बल्लारपूर - तुम्ही टेरिसवर का आले? अशी विचारणा का केली म्हणून दोन गटात भीषण मारामारीची घटना बल्लारपूर शहरात 5 ऑगस्टला घडली.
रात्री 8 वाजेदरम्यान नवीन बस स्थानकजवळ व्यंकटेश अपार्टमेंट च्या छतावर अर्जुन बहुरीया, मोरेश्वर मेश्राम व मोहित चव्हाण गेले होते.
त्यावेळी गुरमित सिंग वैद्य यांनी तिघांना तुम्ही छतावर का आले अशी विचारणा केली.
मात्र ही विचारणा हळूहळू वादात बदलत हाणामारीत रूपांतर झाली, वाद टोकाला गेल्याने नागरिकांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र वाद काही सुटत नसल्याने नागरिकांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन करीत माहिती दिली. #news34
पोलीस घटनास्थळी दाखल होताच दोघांनी तिथून पळ काढला, झालेल्या तुंबळ हाणामारीत अर्जुन बहुरीया हा युवक जखमी झाला, अर्जुन ला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत घटनेचा पुढील तपास केला आहे.
लहान कारणावरून आता जिल्ह्यात वाढत असलेले नागरिकांचा मनस्ताप व दहशत वाढविणार आहे, पोलिसांनी रेकॉर्डवरील असलेले दहशत पसरविणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागलेली आहे.