चंद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिके समोर अमृत योजनेच्या संदर्भांत केलेले आंदोलन म्हणजे राष्ट्रवादीचा उभा धिंगाणा होय असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केले.आंदोलन करण्यापेक्षा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे तर त्यांनी चौकशी करायला हवी व त्याचा निष्कर्ष काढायला हवा असे न करता फक्त प्रसिद्धीच्या निव्वळ हव्यासापोटी आंदोलन करणे म्हणजे हा राजकीय स्वार्थासाठी उभा धिंगाणा असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बदनाम करण्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून अशा news34 आंदोलनाला कोणताही अर्थ उरत नाही राजकीय स्वार्थासाठी हे आंदोलन आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ला आव्हान करतो की निवडणुकीच्या आधी या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व दोषी आढळल्यास कारवाई करून गुन्हा दाखल करावा आरोप निष्पन्न न झाल्यास आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभे करू नये.
या सर्व प्रकरणामध्ये तोडपाणीसाठी तर राष्ट्रवादी चौकशी करीत नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संयुक्तरित्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून असे सांगितले आहे.

