चंद्रपूर - आज दि 12/8 /2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हा चंद्रपूर यांच्या माध्यमातून सुब्बई चिंचोली ता राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील 205 प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला व नोकरी द्या या विषयाला धरून आज चंद्रपूर BRSP Chandrapur जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनातुन असा इशारा देण्यात आला कि 205 प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला व नोकरी लवकरात लवकर देण्यात यावी वेस्टर्न news34 कोलफिल्डस लिमिटेड नी section 4,7,9 आणि ,11, section लागु शेती अधिग्रहण करुन सात ते आठ वर्षे ओलांडून गेली असता सुध्दा शेतकरी प्रकल्पग्रस्तांना आतापर्यंत या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.
या एक दिवसीय धरने आंदोलनातुन wcl मुर्दाबाद चे जोरदार नारे लावण्यात आले जिल्हाधिकारी व वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड यांनी जर लवकरात लवकर पाऊल उचलले नाहीत तर समोर आम्ही तीव्र आंदोलन करु चंद्रपूर शहरातील रस्ते जाम करुन असा इशारा जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिला हे आंदोलन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड मा. सुरेश माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली अँड. भुपेंद्र रायपुरे सर, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या वेळेस सुब्बई येथील प्रकल्पग्रस्तांनी खुप मोठा प्रमाणात उपस्थित दर्शविली.
जर लवकरात लवकर या शेतकऱ्यांची रास्त मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर शेतकरी कोणत्याही आंदोलनाला घाबरणार नाही असे चित्र या आंदोलनातुन दिसुन आले या वेळेस उपस्थित अँड. भुपेंद्र रायपुरे सर जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष विजय गोंडाणे, युवा अध्यक्ष मोंटो मानकर, शेतकरी संघटनेतून अरुण सोमलकर, निबरड शरद पाईकराव, अशोक आसमपल्लीवार, जगदीश मारबते, ईश्वर बेले, नितीन कन्नाके, फारुख शेख, इरफान पठाण, सचिन माहुरे, विलास वाघमारे व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

