चंद्रपूर :- रेल्वेच्या धडकेत अस्वलीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. मृतक अस्वल मादी असून 3 वर्षाची आहे.
चिचंपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मुल उपक्षेत्राच्या , नियतक्षेत्रातील घटना आहे. मालगाडी रेल्वेच्या धडकेत पहाटेच्या सुमारास मुल कडून गोंदिया मार्गे जाणाऱ्या मुल- चीचोली गावाजवळ रेल्वे लाईन पिलर क्रमांक.1198/9 जवळ रेल्वेच्या धडकेत आढळून आली.
रेल्वे ची धडक बसल्याने अस्वलीची घटनास्थळी च मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृत अस्वलाला शवविच्छेदना करीता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, चिचपल्ली येथे नेण्यात आले.