घुघुस - शहरातील अमराई वार्ड क्रमांक 1 मध्ये 28 वर्षीय सूरज माने या इसमाने गळफास घेत आत्महत्या केली. News34
16 ऑगस्टला रात्री अमराई भागातील वीज नसल्याने सर्वत्र अंधार पसरलेला होता, याचा फायदा घेत सूरज ने अंगणातील झाडावर गळफास घेत आत्महत्या केली.
मात्र ही आत्महत्या की हत्या आहे याचा शोध पोलीस घेत आहे, मृतक सूरज यांच्या पाठीवर जखमा आहे व मृतदेहाच्या बाजूला रक्ताचे डाग असून ते रक्त कुणाचं आहे? याचा तपास सुरू आहे. Murder suicide
मृतक च्या पत्नीला सूरज चा मृतदेह दिसताक्षणी ती बेशुद्ध पडली, तिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मृतक सूरज हा ट्रॅक्टर चालवीत आपल्या परिवाराची उपजीविका भागवायचा, मात्र 16 ऑगस्टच्या रात्री अस काय घडलं? हत्येला आत्महत्येचं स्वरूप दिलं का? या बाबीचा शोध घुघुस पोलीस करीत आहे.
