घुघुस - शहरातील वेकोली वसाहतीमधील राजीव नगर येथे सायंकाळच्या सुमारास 2 गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
दोन्ही गाय या राजीव कॉलनी निवासी हरेराम यादव यांच्या मालकीची होती. News 34
सायंकाळी या गाय चरायला गेल्या होत्या काही वेळाने गायी परत येत असताना विजेच्या खांबाला त्यांचा स्पर्श झाला, या धक्क्यात दोन्ही गायी जागीच मरण पावल्या.
सदर लोखंडी खांबाला विजेचा प्रवाह आल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे, सदर खांब हा तात्काळ हटविण्यात यावा यासह नागरिकांनी गाय मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
