घुघुस - शहरात सिमेंट फॅक्टरी, वेकोली, लॉयड्स मेटल असे अनेक उद्योग असल्याने कच्चा व पक्का माल ने आण करण्यासाठी असलेल्या रेल्वे फाटकाचा त्रास सर्वसामान्य जनतेला मागील अनेक वर्षांपासून होत आहे.
मात्र या रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे निर्माण व्हावे अशी प्रत्येकानी मागणी करून सुद्धा यावर कुणाचेही लक्ष नाही.
गेट बंद झाले की वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होते, जड वाहने, कार व दुचाकी यांच्या लांबच लांब रांगा लागतात. #News34
मात्र आज तर ह्ददच झाली, राजीव रतन रुग्णालय परिसरातून रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका चंद्रपूरच्या दिशेने निघाली असता नेमकं त्याचवेळी रेल्वे गेट बंद झाले.
रुग्णाची प्रकृती चिंताजनक आणि समोर वाहनांच्या रांगा यामुळे त्या रुग्णवाहिकेला रस्ता शोधण्यास खूप वेळ निघून गेला.
ही तर आजची गोष्ट झाली मात्र याअगोदर सुद्धा असे प्रसंग कित्येकदा बघायला मिळाले.
रेल्वे फाटक सुरू झाल्यावर नागरिक बाहेर निघण्यासाठी धावपळ करीत वाहने विरुद्ध दिशेने बाहेर काढतात त्यामुळे सदर वाहतूक विस्कळीत होते, आधी या फाटक जवळ वाहतूक पोलीस नियमित राहत होते मात्र आता ते सुद्धा दुर्लभ झाले आहे, या रेल्वे फाटक जवळ कायमस्वरूपी वाहतूक पोलीस असावा अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे.