चंद्रपूर - केंद्रातील भाजप सरकारने जाणीवपुर्वक सहकार्य न केल्यामुळेच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर गदा आली असुन हे आरक्षण परत लागु करण्याकरीता केंद्र सरकारकडे त्यांच्याकडे असलेला ओबीसी समाजाचा डाटा सर्वोच्च न्यायालयाकडे सुपुर्द करावा या OBC Reservation मागणीसाठी चंद्रपुर जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे वतीने देशाचे महामहीम राष्ट्र्पती महोदयांना जिल्हाधिकारी, चंदपुर यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले. Imperical data पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांचे मार्गदर्षनात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष रामु तिवारी, ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र बोबडे, ओबीसी विभाग ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांचे उपस्थितीत सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी महीला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक राजेष अडुर, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, संदीप सिडाम, ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ताजणे, चंद्रपुर तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, लहु चहारे, राजु साखरकर, हाजी अली, अतुल दिवसे, योगेश ताजणे, महेष राजुरकर, बाबुराव सेन, यशवंत नक्कावार, निलेष पिंगे आदींची उपस्थिती होती. #news34chandrapur
केंद्र सरकार आरक्षणाची 50 टक्के असलेली मर्यादा वाढवत नसल्याने राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार बहाल करून काहीही उपयोग होणार नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र् प्रदेश काॅंग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांचे नेतृत्वात, महाराष्ट्र् प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांचे निर्देषानुसार 9 आॅगश्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधुन राज्यभर जिल्हाधिका-यांचे माध्यमातुन राष्ट्र्पती महोदयांना निवेदन पाठविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणुन चंद्रपुरात सदर निवेदन देेण्यात आले. सदर डाटा केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने उपलब्ध करून न दिल्यास काॅंग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे वतीने दिल्ली येथील जंतर मंतर येथे लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव धडक देणार असुन यापुढील टप्प्यात जेलभरो आंदोलन देखील करण्यात येणार आहे.