News34 chandrapur
चंद्रपूर - मागील अनेक दिवसांपासून पाऊस पूर्णपणे गायब झाला असून सध्या जणू उष्णतेचे वारे वाहू लागले आहे.
पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढून गेली आहे, मात्र अश्यात विदर्भात पावसाचं पोषक वातावरण निर्माण होत आहे.
पुढील 2 दिवसात विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई, पुण्यासह विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. News34
आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा आणि मोठ्या झाडाखाली आडोशाला उभा न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. उद्याही राज्यात हीच स्थिती राहणार असून वरील अकरा जिल्ह्यांना उद्याही येलो अलर्ट जारी केला आहे. पण राज्यात इतरत्र मात्र चालू आठवड्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार असून, पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे.