चंद्रपूर - शहरातील तुकूम परिसरातील VIP भागात मोठी घरफोडी झाल्याची घटना घडली.
राजेंद्र उर्फ प्रकाश जयस्वाल असे फिर्यादीचे नाव आहे, जयस्वाल हे जिल्ह्यातील परवानाधारक सावकार आहे, सावकारी क्षेत्रात त्यांचं नाव मोठं गणले जाते.
जयस्वाल यांच्या घरून अज्ञात चोरट्यानी 15 लाख रुपये रोख व 22 लाखांचे सोनं असा एकूण 37 लाखांची धाडसी चोरी केली.
चोरांची हिम्मत म्हणावी लागेल त्यांनी चक्क सावकाराच्या घरी डाका टाकला. #News34
सदर गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात शहर व रामनगर डि बी पथक करीत आहेत, पुढील तपास रामनगर डीबी पथकाचे एकरे करीत आहेत.