कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यात विराजमान अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका येथील पालडोह या छोट्याश्या गावात जिल्हा परिषद शाळा असून येथे वर्षाच्या ३६५ दिवस लहान-लहान मुलांना शिक्षणाचे धडे दिले जाते.अगदी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा येथे शिकवणी वर्ग सुरू असतो.याचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक पदी रुजू असलेले "राजेंद्र परतेकी" नामक शिक्षक यांना जाते. हे पालडोह येथील जि.प.शाळेत शिक्षक म्हणून २००६ यावर्षी रुजू झाले होते. जिवती सारख्या दुर्गम भागात कित्येक शिक्षक येण्यास टाळाटाळ करतात.जर आलेच तर इथुन बदली करून घेण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करतात असे बोलले जात असून शिक्षक परीतेकी हे याला अपवाद ठरले आहे.जवळपास १५ वर्षे लोटूनही यांनी येथुन बदलीचा विषय मनात आणलेला नाही.या काळात यांनी शाळेचा नकाशा बदलून टाकल्याचे चित्र असून यांच्या प्रयत्नाने याठिकाणी ९ आणि १० वि चे वर्ग मंजूर झाले आहे.
परतेकी सरांच्या प्रयत्नाने ही शाळा डिजिटल शाळा म्हणून प्रसिद्धीस आली.ही शाळा महाराष्ट्रात १७ तर चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.येथील शिक्षणा विषयी बोलायचे झाले तर विद्यार्थी सुद्धा विद्यार्थ्यांना परिपाठ पूर्णपणे शिकवतात. News 34
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे क्रांती सप्ताह दिन राबवण्यात आला.याच पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षकांचा सत्कार म्हणून प्रहार तर्फे परतेकी सरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर,पंकज माणूसमारे,तिलक पाटील, जीवन तोगरे,अनूप राखुंडे यांनी सदर शाळेला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेत पुढील वाटचालीसाठी शिक्षक परतेकी यांना शुभेच्छा दिल्या.
