चंद्रपूर - महाकाली मंदिर च्या बाजूला आज 2 गायींना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पालिकेतर्फे अमृत योजनेचे काम केल्यावर त्या जागी महावीतरणतर्फे अंडरग्राऊंड विजेची लाईन टाकण्यात आली मात्र काही तार आत न टाकता ती रस्त्यावर उघडी ठेवण्यात आली होती. News34
त्या तारेत जिवंत विद्युत प्रवाह सुरू झाला, मात्र त्या विद्युत प्रवाहाचे बळी 2 मुके जनावर ठरले.
महाकाली मंदिर ते भिवापुर जाणारा हा मार्ग वर्दळीच्या ठिकाणी असून नागरिक त्यापासून बचावले असले तरी जनावरांना आपला जीव मात्र गमवावा लागला, याला जबाबदार कोण? महावितरण की महानगरपालिका? याबाबत गायी मालकाने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.
