प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- कोविड-19 चा काळ अजून संपलेला नाही आणी तिसऱ्या लाटेचे भाकीतही तज्ञांनी वर्तविले आहे असे असतांना सर्व उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी प्रमाणे शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करुन प्रत्येक नागरिकांनी स्वतः सुरक्षित राहून दहीहंडी, पोळा, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव असे सर्व सणाचे उत्सव साजरे करावे आणि कायदा सुव्यवस्थेला, तालूका व नगर प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनी केली. पोलीस स्टेशन मुल च्या वतीने आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या शांतता कमेटीच्या सभेत मार्गदर्शन करतांना ठाणेदार राजपूत बोलत होते. कोरोना हद्दपार झाला असे समजून नागरिक बिना मार्कस वापरता फिरायला लागले असून ही चूक नागरिक करीत आहेत. यासाठी सावध राहून सण उत्सवाच्या काळात कोविड-19च्या नियमांचे पालन करावे आणि दहीहंडी,पोळा,मारभत, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव,ईद ए मिलाद, अशा सर्व सणांना कायद्याचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी दिली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी प्रशासनालाही सहकार्य करावे.असे आव्हान केले. याप्रसंगी न.प.मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यानीही मागील वर्षी प्रमाणे नगर प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगून मंडळाकडूनही सहकार्याची अपेक्षा केली. तर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. उज्वल इंदूरकर यानीही कोरोना आहेच,तोही वेगवेगळे रूप धारण करीत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून लसीकरण करुन घ्यावे, मार्कसचा वापर करुन सोशल डीस्टॅन सिंगचे पालन करावे, तसेच सामाजिक हिताचे उपक्रम राबवावे,रक्तदाब शिबीर घ्यावे असेही आव्हान केले. सभेला उपस्थित जेष्ठ नागरिक डाँ. राममोहन बोकारे, नगर सेवक अनिल साखरकर, यांनी प्रशासनाला काही सूचना करुन नागरिकांनाही सहकार्य करावे अशी विनंती केली. सभेचे संचालन व मार्गदर्शन पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनी केले .आभार सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी उत्तम कुमरे,सुनील घोडमारे, सचिन सायनकार,सुरेश खोब्रागडे,यांनी परिश्रम घेतले. सभेला न.प.उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे,नगर सेवक मिलिंद खोब्रागडे,प्रशांत लाडवे, यांचेसह शांतता कमिटीचे सदश,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
