News34 #Murder in rajura
राजुरा - शहरातील सोमनाथपुर वार्डातील रहिवासी राहणारे देवगडे भावंडात आज दुपारी कडाक्याचे भांडण झाले, भांडणाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाल्याने मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केला.
लहान भाऊ हालचाल करीत नसल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत लहान भावाने प्राण सोडले होते.
दुपारच्या सुमारास मोठा भाऊ सूरज देवगडे व धीरज देवगडे या दोन भावंडात भांडण सुरू झाले होते, अचानकपणे भांडणाचा आवाज वाढल्याने परिसरातील नागरिकांची गर्दी झाली मात्र यावेळेत मोठा भाऊ सूरज ने धीरज चा गळा दाबून खून केला होता, धीरज मृतावस्थेत तब्बल 1 तास घरीच पडून होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे, हत्या कोणत्या कारणावरून झाली हे मात्र अस्पष्ट आहे.