कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़अली:-
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील मुरली सिमेंट कंपनीत पुर्वी हजारो कामगार काम करीत होते.असे असताना कंपनी बंद पडली.परिणामी कामगार बेरोजगार झाले. त्यांना कामाचा मोबदलाही कंपनीकडून मिळाला नाही.मोबदल्यासाठी बरेच वर्ष संघर्ष चालला. त्यानंतर दालमिया भारत सिमेंटला कंपनीचे अधिग्रहण हस्तांतर देण्यात आले. जुन्या कामरांना घेण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते अशी माहिती आहे.मात्र आता या कामगारांचा प्रश्न निकाली न काढता, स्थानिक मजुरांना कामावर रुजू व थकबाकी देयके न देता सदर कंपनीने सिमेंट उत्पादन करून विक्री सुरू केली आहे.कंपनी व्यवस्थापनाने पूर्वीच्या स्थानिक कामगारांकडे दुर्लक्ष करत ठेकेदारामार्फत परराज्यातील मजुरांचा भरणा केला. "स्थानिक उपाशी, परप्रंतीय तुपाशी" अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.आपले शोषण होत असल्याचे पाहून कामगारांमध्ये तीव्र असंतोष असून शेवटी यांनी कुटुंबांसह ६ जुलै पासून दालमिया सिमेंट कंपनीपुढे आंदोलन सुरू केले."जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय उद्योग चालू देणार नाही" असा खणखणीत इशारा अन्याग्रस्त कामगारांनी यावेळी दिला.
मुरली सिमेंटने २०१५ पर्यंतचा थकीत वेतन अद्यापही कामगारांना दिला नसल्यामुळे अंदाजे पाचशे कामगारांना आर्थिक,मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.पूर्वी जे कामावर होते अशा कंत्राटी तसेच पॅकिंग प्लाँट व कायमस्वरूपी सर्व कामगारांना न्याय न देता नवीन परप्रांतीय मजुरांना २८० ते ३५० रु.प्रमाणे कंत्राटदारामार्फत कामावर घेतले जात असल्याने स्थानिकांमध्ये चिड निर्माण झाली आहे.व्हेजबोर्ड प्रमाणे स्थानिक मजुरांना देयके दिले जात नाही.त्यांचा पीएफ कपात केला जात नाही.यामुळे मजुरांचे भविष्य धोक्यात आले आहे.काही कारणास्तव मजूर जर एक,दोन दिवस कामावर आले नाही तर संबंधित कंत्राटदार कामावरून काढून देण्याची धमकी देतता.यामुळे असंतोष वाढत असून कामगार वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक कामगारांच्या मागणीचा प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी तातडीने कंपनी व्यवस्थापन व कामगारांची संयुक्त बैठक घ्यावी,पूर्वीच्या कामगारांचा समावेश करावा. बाहेरचे मजूर बोलावून काम करण्याचा प्रयत्न निषेधार्थ असल्याने स्थानिक कामगार रस्त्यावर उतरून आपल्या हक्काची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही. कामगारांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिकांना कामावर रुजू करावे अशी मागणी राकाँ नेते सैय्यद आबीद अली यांनी ७ व ८ जुलै रोजी आंदोलन स्थळी भेटी दरम्यान केली.राजूरा विधानसभेचे माजी आमदार अँड.वामनराव चटप आणि तालुक्यातील इतरही नेत्यांनी आंदोलनकर्यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतल्या.सदर आंदोलनात नारंडा कामगार संघटना अध्यक्ष मनोज भटारकरसह सचिव रमेश वेट्टी,गुरूदास वराते,बंडू हेकाड,अमोल वाघमारे,सुरेश खंडाळे,बालाजी शिंदे आदी कार्यकर्ते व कामगारांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.
-----------//--------
"दालमिया सिमेंट कंपनी मॅनेजमेंट आणि आंदोलनकर्ते कामगारांमध्ये ८ जुन रोजी चर्चा झाली.कंपनीने वेळ मागितल्या प्रमाणे आम्ही त्यांना ७ दिवसाची मुदत दिली.मागण्या संदर्भात काही सकारात्मक घडले नाही तर ७ दिवसानंतर पुन्हा आम्ही आंदोलन करू.आम्ही आंदोलन मागे घेतलेला नाही.त्यांच्या मागणीनुसार कामगारांना काम करण्याची मोहलत दिली आहे.त्यानंतर पुन्हा आम्ही आंदोलन तीव्र करू आणि सामोरचे कार्य करू, लेखी काही दिलेले नाही फक्त त्यांना वेळ दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त काही केलेला नाही."
"मनोज भटारकर"
कामगार संघटना अध्यक्ष
----------//-------