कोरपना - नारंडा सिमेंट कामगार संघशी सलग्न हिंद मजदूर सभा च्या वतीने नारंडा येथील
दालमिया सिमेंट उद्योगासमोर कामगार संबंधित विविध मागण्यासाठी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे.
यात जुन्या मुरलि ॲग्रो कंपनीतील संपूर्ण जुन्या कामगारांना सामावून घ्यावे, वेज बोर्डच्या नियमानुसार कामगारांना वेतन देण्यात यावे, कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे आदी प्रमुख मागण्या सह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगाराच्या परिवारांनी सहभाग घेतला असून संपूर्ण परिवार आंदोलनात उतरला आहे. सदर आंदोलनप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज भटारकर, सचिव रमेश वेट्टी, गुरुदास वराते, बंडू हेकाड,अमोल वाघमारे, सुरेश खंडाळे, बालाजी शिंदे आदीसह शेकडो कामगार उपस्थित होते.
