चंद्रपूर - जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1जुलै ते 7 जुलै या कालावधीत सर्व देशभर सर्वत्र वनमहोत्सव साजरा केला जातो. देशात, राज्यात वनराई वाढून,हिरवाई वाढून, पर्यावरण शुद्ध व्हावे, वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी या उद्धेशाने वृक्षारोपण करण्यात येते. त्याचाच परिपाक म्हणून आज 7 जुलै 2021 रोजी चंद्रपूर परिमंडळ कार्यालय परिसरात, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुनील देशपांडे यांच्या हस्ते, वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
उपस्थित सर्व अभियंता वर्ग,अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवित कोविड नियमांचे पालन करत वृक्षारोपण केले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंत्या श्रीमती. संध्या चिवंडे,अधीक्षक अभियंता(इन्फ्रा )श्री.सुहास म्हेत्रे, कार्य. अभियंता श्री.संजय वैद्य, कार्य. अभियंता श्री. शीतलकुमार घुमे,सहा. महाव्यवस्थापक (मा. सं)श्री. सुशील विखार , उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.योगेश गोरे,वरिष्ठ व्यवस्थापक (वी व ले ) श्री. राकेश बोरिवार अति. कार्य. अधिकारी श्री. जयंत खीरकर व इतर अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर परिमंडळ कार्यालय अंतर्गत उपकेंद्रे, तसेच सर्व कार्यालयांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे.
