कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज अली:-
कोरपना तालुक्याच्या गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या आवारात असलेल्या "आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर तथा विद्यालय" येथील शिक्षिका सौ.सत्यशिला काशीनाथ शेगोकर ह्या प्रलंबित वेतन, पेन्शन व इतर लाभ शासनाकडून मिळावे म्हणून शाळेने रूजू करून रुजू पत्र द्यावे या मागणीसाठी भरपावसात १२ जुलैपासून शाळेच्या गेटसमोर सहकुटुंब उपोषणाला बसलेली आहे.मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका सदर शिक्षिकेने घेतली आहे.
सौ.सत्यशिला शेगोकर ह्या सदर शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.कोणतेही कारण नसताना अचानकपणे यांना काढण्यात आले.या अन्याया विरूद्ध अनेकदा संस्था सचिव व संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तोंडी व लेखी पत्र व्यवहार केला मात्र काहीच सकारात्मक घडले नाही.वरिष्ठांच्या पत्रला न जुमानता शाळेचे सचिव व मुख्यध्यापिका यांना रुजू करत नाही व रुजू पत्र ही देत नाही.संस्थेने यांना पर्मनंट ठेवले,आर्डर ही दिले,प्रस्ताव आहे.असे यांचे म्हणणे असून इतके सगळे असूनही अन्याय होत असल्याची भावना शिक्षिकेने सदर प्रतिनिधींनी पुढे व्यक्त केली आहे.बातमी लिहिस्तोवर उपोषण स्थळी सदर शिक्षिकेला भेटायला संबंधितांपैकी कुणीच आलेला नव्हता,उपोषण सुरूच आहे.
----------//--------
"शिक्षणाधिकारी यांनी लेखी,तोंडी आर्डर दिला की,मॅडम तुम्ही शाळेत जा,पण हे मला शाळेत घेत नाही म्हणून मला हा मार्ग अवलंबवावा लागला.मला कुठलाही पगार नाही.माझी मागणी न्यायी आणि रास्त आहे.शाळेवर लागल्यापासून मी पगार उचललेला नाही. ज्याप्रमाणे डेप्युटी डायरेक्टर कार्यालयाकडून मंजूरी आली,त्याप्रमाणे यांनी मला शाळेत रूजू करावे.म्हणजे मला शासनाकडे वेतन बिलं भरता येईल.माझी फक्त ऐवढीच मागणी आहे.यांनी मला शाळेत रूजू करून घ्यावे आणि रूजू पत्र द्यावे.पण हे वेळ मारून नेतात,युक्तिवाद करतात,जो कुणी यांच्याकडे गेला त्यांना हे बरोबर फिरवतात आणि पद्धतशीरपणे बाजूला करतात.माझी मागणी पुर्ण होईपर्यंत मी हटणार नाही."
(सौ.सत्यशिला शेगोकर,शिक्षिका)
--------//--------
"सदर महिलेला घेतेवेळी कंडिशन होती. जर गव्हरमेंट कडून अप्रोवल मिळाला नाही तर संस्था पगार देणार नाही आणि तीने अशाच पद्धतीने स्टैंप पेपरवर लिहून दिले आहे की,संस्थेला पगार मागणार नाही. हिचा भाऊ आमच्या संस्थेत जॉइंट सेक्रेटरी होता.आता तो मरण पावला आहे. आमचे चांगले संबंध होते.यांचं कुठेतरी भलं व्हावा म्हणून यांना दहावी,बारावी पास करायला लावले.त्यावेळी चपराश्याची ही जागा न्हवती.अनट्रेन टिचर म्हणून घ्या असे यांचे म्हणणे होते पण अनट्रेन टिचरला मंजूरी मिळणार नाही तुम्ही डिऐड करा नंतर रितसर घेऊ.पण हिने नकार दिला.यासंबधी तुम्ही सर्वांना बोलावून सर्व डिटेल्स देणार आहे.घेण्यास काही हरकत नाही पण पगार कोण देणार.ही महिला अकरा वर्षापासून आमच्या शाळेत नाही. आम्ही काय करू शकतो.संस्था कुठून पगार देणार. शासन जर हिच्या पगाराची जबाबदारी घेत असेल तर आम्ही आताही घ्याला तयार आहो.नाही तर माझ्यासोबत चला संबंधित अधिकारी जर म्हणत असेल तर आमची काही हरकत नाही. अजून डिटेल्स लवकरच तुम्हाला देतो."
(बीएन मोहितकर,संस्था सचिव)
----------//--------
