चंद्रपूर / मूल तहसिल चे कर्त्यव्य दक्ष तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांची बदनामी करणारे भूमिपुत्रा ची हाक या न्युज पोर्टल चे संपादक वरोरा येथील रहिवासी राजू कुकडे यांचेवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करून न्युज पोर्टल बंद करावा अशी मागणी जिल्हाधिकारी अजय गुलाने यांचे कडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे.
राजू कुकडे हे एका कर्तव्य दक्ष तहसीलदाराला बदनाम करून रेती तस्करीला साथ देणे, रेतीमाफियकडून पैसे घेणे असे आरोप भूमिपुत्रा ची हाक या न्युज पोर्टल वर केली आहे. प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असून राजू कुकडे हे खंडणीसाठी कुप्रसिद्ध असून अनेक पिडीतांनी त्याला मारहाण केली आहे. व त्यांचेवर वरोरा पोलिस स्टेशन ला अनेक गुन्हे दाखल असून विकृत मानसिकतेचा व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. असे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव महिपाल मडावी यांनी व्यक्त केले असून एका आदिवासी तहसीलदाराला जाणीवपूर्वक बदनाम करून प्रतिमा मलिन करणारे राजू कुकडे यांचेवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे .
न्युज पोर्टल च्या माध्यमातून अधिकाऱ्यांना वेटीस धरणे व नाहक त्रास देणे हे काम राजू कुकडे करीत असल्याने त्यांचा पोर्टल तत्काळ बंद करण्यात यावा अशीही मागणी निवेदनातून केली असून राजू कुकडे यांचेवर कार्यवाही न झाल्यास आदिवासी समाज आंदोलन करेल असेही सांगितले आहे.
निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखडेकर यांनी स्वीकारले असून राजू कुकडे यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम, विदर्भ सचिव महिपाल मडावी, जिल्हाध्यक्ष प्रदीप गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष नितीन सिळाम उपस्थित होते.