वरोरा - दि,१६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला असता सेंट ॲनिस विद्यालयातील कु.वासंती संजय बोंडे हिला ९८.२० टक्के गुण मिळाले. तिच्या या यशा बाबत ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोऱ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अशपाक शेख सचिव सुनिल शिरसाट उपाध्यक्ष फैज पटेल, पदाधिकारी, हितेश राजनहिरे, संजय गायकवाड, विश्वदीप गोंडणे, मुजाहिद कुरेशी, अजीम शेख, आणि इतर सदस्य उपस्थित होते.
वासंतीने इंग्रजी, मराठी, हिंदी, विज्ञान तंत्रज्ञान व सामाजिक शास्त्र या सहाही विषयात प्रावीण्य मिळविले आहे, वासंतीला अभ्यासासोबतच विविध कलागुणांची आवड असून चित्रकला हा विषय तिचा जिव्हाळ्याचा आहे, मागील संपूर्ण वर्ष कोरोनाच्या महामारीने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाले असतांना. दुसरी लाट आली आणि पुन्हा शाळेला कुलूप लागले. त्यामुळे प्रचलित परीक्षा पध्दतीला टाळून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या निकाल देण्यात आला. ऑनलाईन शिक्षण प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. परंतु वासंतीने आपल्या जिद्दीच्या बळावर कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता दहावीत घवघवीत यश संपादन केले. या यशाचे श्रेय ती आपल्या शिक्षकांना आणि तिच्या पालकांना देते, वासंती चे वडील संजय बोंडे हे प्राध्यापक असून आई सौ, स्मिता बोंडे ह्या सुध्दा शिक्षिका आहेत. वासंती बरोबरच तिच्या आई वडीलांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.निकाल जाहीर झाल्यापासून निकालाची वेबसाईड क्रॅश झाल्याने जिल्ह्यातून ,तालुक्यातून किंबहुना शाळेतून कोणी बाजी मारली हे अद्याप समजले नाही.