मुल- यावर्षीच्या शेतीच्या हंगामासाठी एप्रिल महिन्या पासूनच मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची खताची व कीटक नाशक औषधांची मागणी लक्षात घेऊन आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीने कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि. प.माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय कमी भावात रासायनिक खत व कीटक नाशक औषधांचा पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत असून शासनाने पुरवठा केलेल्या खतांना योग्य मागणी असल्यामुळे संस्थेच्या वतीने आत्तापर्यंत 1130 शेतकऱ्यांनी 9000 बॅगचे वर रासायनिक खत, 630 शेतकऱ्यांनी 2000 नगांचे वर रासायनिक औषधे तसेच 330 शेतकऱ्यांनी 1200 बॅगचे वर बियाणे संस्थेतून खरेदी केलेली आहे.
तसेच शेतकऱ्यांची युरिया, 20.20.0.13, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांना मोठ्या प्रमाणत मागणी असते. तसेच 12.32.16 या खताला सुद्धा जास्त मागणी केली आहे परंतु पुरेश्या प्रमाणत मागणी असलेल्या खताचा पुरवठा शासनाकडून होत नसल्याने मागणी करणाऱ्या काही शेतकऱ्यांना दुसरीकडे जावे लागत आहे. करिता शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या खतांचा पुरवठा त्वरित करावा अशी मागणी आदर्श खरेदी विक्री सहकारी सोससीटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे यांनी संचालक मंडळाच्या वतीने शासनाकडे केली आहे.
तसेच युरिया 266/-, 20.20.0.13 ग्रोमर 1050/-, 20.20.13 एफको 975/- सिंगल सुपर फास्फेट 430/- 10.26.26 एफको 1175/- या खताची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आता रोवणीला वेग येणार असून तालुक्यात भरपूर प्रमाणात मागणी केलेले खत भरपूर प्रमाणात लागते करिता शासनाने शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या खतांचा पुरवठा त्वरित व भरपूर प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आदर्श खरेदी विक्री सहकारी सोससीटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, उपसभापती विनोद गाजेवार, यांचेसह समस्त संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी केली आहे.