घुघुस - कोरोना संकटाचे सध्या दुसरं वर्ष सुरू आहे, या काळात रोजगार बुडाला अनेकजण घरी बसले, आर्थिक तंगीने काहींनी आत्महत्या सुद्धा केल्या, कोरोनाच्या जीवघेण्या संकटात पण खाजगी शाळांनी चांगलाच धुमाकूळ घातला.
पालकवर्गाना शाळा फी साठी वारंवार मागणी होऊ लागली, फी भरा अन्यथा ऑनलाइन शिक्षण व परीक्षेला बसता येणार नाही असे फर्मान शाळा संचालकांनी काढले.
खाजगी शाळेच्या फी संदर्भात शासन सुद्धा घेऊ शकत नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला खाजगी शाळेत 15 टक्के फी कपातीचा आदेश दिला, त्यामुळे आता राज्यात खाजगी शाळेतील फी मध्ये 15 टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे.
घुघुस येथे सिमेंट नगर परिसरातील माऊंट कारमेल शाळेत तर विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून चक्क परीक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या एप मधून विद्यार्थ्यांना काढून टाकले.
यावर पालकवर्गानी मुख्याध्यापकांची भेट घेतली मात्र ते काही ऐकायला तयार नाही, परीक्षेत बसायचं असेल तर फी भरावीच लागले असे सांगितले.
नकोडा येथे स्थित माऊंट कारमेल शाळा ही एसीसी सिमेंट व्यवस्थापनाच्या अंतर्गत चालते, फी कपातीचा निर्णय एसीसी सिमेंट व्यवस्थापन घेऊ शकते.
कोरोना काळातील आर्थिक चणचनीमुळे पालकांनी फी भरण्यास हतबलता दाखवली आहे.
पालकांनी 50 टक्के फी कपात करावी व आमच्या मुलांना परीक्षेत सहभागी करण्यात यावे अशी मागणी केली मात्र एसीसी व्यवस्थापन फी कपातीवर बोलायला तयार नाही.

