चंद्रपूर - लसीकरणाची पध्दत साधी, सोपी व सरळ करावी व नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी करणारे एक निवेदन भाजपा महिला आघाडी महानगर अध्यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी नुकतेच मनपा आयुक्त राजेश मोहीते यांना दिले. याप्रसंगी नगरसेवक राजीव गोलीवार, रामपाल सिंह, चंद्रकला सोयाम, शिला चव्हाण, कल्पना बगुलकर, शितल गुरनुले, सविता कांबळे, खुशबु चौधरी, पुष्पा उराडे, महानगराचे माजी अध्यक्ष तुषार सोम उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मागील वर्षी पासून कोरोनाने पूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला आहे व अनेक जण बाधित होऊन यामुळे मृत्युमुखी पाडले आहे. पण मा. पंतप्रधान यांच्या पुढाकारातून लसी उपलब्ध झाल्या आणि अनेक जण याचा लाभ घेत आहेत. तरीही बरेच जण किचकट व जाचक अटींमुळे लसीकरणापासून वंचित आहे. कारण ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे कठीण जाते व पुष्कळांना ते करताही येत नाही. त्यामुळे खास करून वृध्द नागरिक व दिव्यांग नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. लसीचा पुरवठा देखील अल्प प्रमाणात होत असल्याने वृध्द नागरिक, दिव्यांग व युवा वर्ग नाराज आहेत. वृध्द नागरिक, दिव्यांग यांना ऑफ लाईन पध्दतीने टोकन देऊन लसीकरण केल्या जात आहे परंतु पुरवठा अत्यल्प असल्याने काही नागरिकांना ताटकळत राहावे लागते किंवा परत फिरावे लागते व दुस-या दिवशी पुन्हा लाईनमध्ये लावावे लागते. त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागतो.
टोकन दिल्यावर लस जर संपली तर ज्या नागरिकांपर्यंत ही लस संपली असेल तर त्यांना त्याच टोकन वर दुस-या दिवशीची तारीख टाकून १,२,३ या पुढे असे नंबर टाकावे जेणेकरून दुस-या दिवशी त्यांना प्रथम लसीकरण करून घेता येईल. तसेच युवा वर्गामध्ये सुध्दा ऑफलाईन लसीकरण सुरू करावे. त्याचप्रमाणे प्रत्येक लसीकरण केंद्रावर किती लसी दिल्या याची माहिती द्यावी, अशी मागणी सुध्दा त्यांनी याप्रसंगी केली.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी व माजी पालकमंत्री मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे उदि्दष्ट आहे की महानगरात १०० टक्के लसीकरण झाले पाहीजे. त्यानुसार भाजपा चंद्रपूर आपल्या पूर्ण शक्तीनिशी महापालिकेच्या मागे उभी आहे व जी मदत लागेल ती करण्यास तयार आहे.
