घुघुस - चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवरील मुंगोली उड्डाणपूलावर काही महिन्यांपूर्वी स्टेअरिंग रॉड तुटल्याने 18 चक्का ट्रक पुलाची चॅनेल फेंसिंग तोडून ट्रक वर्धा नदीत पडला.
त्या दिवसापासून ते आजपर्यंत मुंगोली पुलाची अवस्था तशीच आहे, चॅनेल फेंसिंग अजूनही तुटलेल्या अवस्थेत असल्याने पुन्हा त्या पुलावर दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
हा पुल मुंगोली व पैनगंगा येथील वेकोली कर्मचारी यांच्या रहदारीचा मार्ग आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर व यवतमाळ हा जिल्हा या पुलामार्फत जोडल्या गेला आहे.
सदर पूल हा वेकोलीच्या अधिकारात येत असून त्यांच सुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून वर्धा नदी भरून वाहत आहे, या पुलावर दुर्घटना झाल्यास जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या दुर्लक्षित व अपघाताला आमंत्रण देणाऱ्या बाबीकडे प्रशासन व वेकोलीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.