मुल- महिलांची सर्वच क्षेत्रात प्रगती व्हावी या उदात्त हेतूने नवीन उडान महीला शेतकरी उत्पादक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने कंपनीचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महिलांनी सर्वच क्षेत्रात पुरुषाप्रमाणे आर्थिक प्रगती करावी असे मत .चंदू मारगोणवार सभापती पंचायत समिती मुल यांनी केले.
दिनांक 7/7/2021 ला नवी उडान महिला शेतकरी उत्पादक कंपनी मुलचा शुभारंभ मा.चंदू मारगोणवार सभापती पंचायत समिती मुल तर प्रमुख अतिथी डाँक्टर मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल जीवन प्रधान विस्तार अधिकारी पंचायत समिती मुल यांचे हस्ते करण्यात आला.
ग्रामीण भागातील उत्पादित वस्तूला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली. सदर कंपनीला दोनशेच्यावर भागधारक जोडलेले आहे. यावेळी ग्रामीण भागातील विविध वस्तूंचे विक्री प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मा.चंदुभाऊ मारगोणवार सभापती पंचायत समिती मुल म्हणाले स्थापन करण्यात आलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी तालुक्यापूर्ती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील इतर महिला शेतकरी यांना सहभागी केल्यास या कंपनीचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. असे सांगितले तर महिलांच्या सर्वांगीण उत्थानासाठी व आर्थिक विकासासाठी ही कंपनी नक्कीच फायदेशीर ठरेल यासाठी महिलांनी सक्रिय राहावे असा सल्ला संवर्ग विकास अधिकारी डाँक्टर मयूर कळसे यांनी दिला असून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या वस्तूवर प्रक्रिया करण्याबरोबरच बीजोत्पादन सारखे विविध उपक्रम राबवून ही कंपनी नावारूपास आणण्यात येईल असे प्रास्ताविकेत सौ. अर्चना बल्लावार अध्यक्ष नवी उडान महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. रोशन साखरे सर जिल्हा व्यवस्थापक, सौ. सुवर्णा आकनपल्लीवार अध्यक्ष तुळशी प्रभाग संघ बेंबाळ, सौ. आरिफा भसारकर अध्यक्ष वृंदावन प्रभाग संघ डोंगरगाव, माया सुमटकर तालुका अभियान व्यवस्थापक, प्रकाश तुरानकर तालुका व्यवस्थापक, निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक, जयश्री कामडी तालुका समन्वयक, स्नेहल मडावी तालुका समन्वयक, वसीम काजी प्रशासन सहाय्यक, अमर रंगारी प्रभाग समन्वयक, हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, रुपेश आदे प्रभाग समन्वयक, मयूर गड्डमवार CAM, भावना कुमरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिपाली पेंदोर निर्मला लाकडे यांनी परिश्रम घेतले.