घुग्गुस - शहरातील अमराई वार्डात एका महिलेला युवकाने भर चौकात मारहाण केल्याची घटना ताजी असताना पुन्हा त्याच वार्डात वाहनचालकाला बेदम मारहाण करण्यात आली, आरोपी हा दारू व गांजा विक्रेता असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
अमराई वार्ड क्रमांक 1 मध्ये राहणारे 38 वर्षीय गौरीशंकर वाढई वाहनचालकाचे काम करतात.
त्याच वार्डात राहणारे अरविंद बापूजी उरकुडे सोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला.
6 जुलै ला वाढई हे घरी जात असताना वाटेत उरकुडे हे दारू पिऊन अचानक वाढई यांना अश्लील शिवीगाळ करू लागले, उरकुडे हे दारू पिऊन असल्याने वाढई यांनी वाद केला नाही.
मात्र सायंकाळी वाढई हे घरी जात असताना अरविंद उरकुडे यांनी वाढई यांना थांबवित मला शिवीगाळ का केली म्हणत वाद घालू लागला, त्याचवेळी अरविंद उरकुडे यांचा मुलगा हर्ष, पत्नी सुनीता व मोठा भाऊ दशरथ हे वाढई यांच्या अंगावर धावत जात त्यांना मारहाण करणे सुरू केले.
अरविंद उरकुडे यांनी लोखंडी पाईपणे वाढई यांच्या डोक्यावर प्रहार करीत वाढई यांना रक्तबंबाळ केले. लाथा बुक्क्या व विटाने वाढई यांना मारहाण करण्यात आली, परिसरातील नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत वाढई यांना घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
आरोपी अरविंद हा गांजा व अवैध दारू विक्रेता असल्याने परिवारात नेहमीच नागरिकांसोबत वाद घालतो अशी माहिती नागरिकांनी दिली.
घुग्गुस पोलीस स्टेशनला याबाबत वाढई यांनी तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
