कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्याच्या गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या आवारात असलेल्या "आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर तथा विद्यालय" येथील शिक्षिका सौ.सत्यशिला काशीनाथ शेगोकर ह्या मागील १ जुलै १९९५ ते १८ डिसेंबर २०१० या कालावधीचे प्रलंबित वेतन,पेन्शन व इतर लाभ शासनाकडून मिळावे म्हणून शाळेने रूजू करून रुजू पत्र द्यावे या मागणीसाठी १२ जुलै २०२१ रोजी पासून भर पावसात छत्रीच्या सहाय्याने शाळेच्या गेटसमोर सहकुटुंब उपोषणाला बसली आहे आणि जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका सदर शिक्षिकेने घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
सौ.सत्यशिला शेगोकर यांचे म्हणणे आहे की,मी १९९५ पासून या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती.कोणतेही कारण नसताना अचानकपणे मला शाळेतून काढण्यात आले. पगारही मिळाला नाही.या अन्याय विरूद्ध अनेकदा संस्था सचिव व संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे पत्र व्यवहार केले.शाळेचे सचिव व मुख्यध्यापिका मला रुजू करत नाही व रुजू पत्र ही देत नाही.मला संस्थेने पर्मनंट ठेवलेले आहे.मला अॉर्डर दिला आहे.माझा प्रस्ताव आहे.इतके सगळे काही असूनही माझ्यावर अन्याय होत आहे.आता शासनाची मंजूरी आली. मला शिक्षणाधिकारी यांनी लेखी,तोंडी अॉर्डर दिला की, मॅडम तुम्ही शाळेत जा,पण हे मला शाळेत घेत नाही म्हणून मला हा मार्ग अवलंबवावा लागला आहे.शासनाकडून मला कुठलाही पगार नाही, माझी मागणी न्यायी आणि रास्त आहे. शाळेवर लागल्यापासून मी पगार उचललेला नाही. ज्याप्रमाणे डेप्युटी डायरेक्टर कार्यालयाकडून मंजूरी आली,त्याप्रमाणे यांनी मला शाळेत रूजू करावे ,म्हणजे मला शासनाकडे वेतन बिलं भरता येईल.माझी ऐवढीस मागणी आहे.यांनी मला शाळेत रूजू करून घ्यावे आणि रूजू पत्र द्यावे. पण हे उगाच उत्तरे देतात,वेळ मारून नेतात, युक्तिवाद करतात,जो कुणी यांच्याकडे गेला त्यांना हे बरोबर फिरवतात आणि पद्धतशीरपणे बाजूला करतात.आणि मला जो त्रास द्यायचा तो सुरूच आहे.यात काही कमी नाही.उपोषणा बाबबतीत मी त्यांना वेळोवेळी भेटुन सांगीतले,पत्र व्यवहार केले, सगळ्या बाबतीत चर्चा केली.असे असतानाही ते आतापर्यंत येथे आलेले नाही.माझी मागणी पुर्ण होईपर्यंत मी हटणार नाही अशी माहिती अन्याग्रस्त या शिक्षिकेने सदर प्रतिनिधींना दिली आहे.
सदर प्रतिनिधींनी मुख्यध्यापिकेला (शाळेत हजर असताना)भेटुन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी चौकीदार द्वारे भेटण्यास नकार कळवला.यानंतर संस्थेच्या सचिवांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता एकदा रिंग गेली मग दुसऱ्यांदा घरातील महिलेने नाव विचारले,सर आहेत का म्हटल्यावर ते हो म्हणाल्या नंतर अंदाजे ३ मिनिटे फोन सतत सुरू होता पण समोरून कुणीही काहीही बोलत नसल्याने शेवटी फोन कट करावा लागला.नंतर लागलाच नाही. म्हणजे संपर्क होऊनही संपर्क झाला नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.याप्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद बनली असून सदर महिलेला यात अशाप्रकारे वेठीस धरणे योग्य नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.शासनाने त्वरित सदर महिलेला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी नागरिकांकडून होतांना दिसली.