चंद्रपूर - आज शहरात भरदिवसा गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये एका युवकाने महिलेच्याया वेशात येऊन बल्लारपूर निवासी आकाश गंधेवार या युवकावर 3 गोळ्या झाडल्या या घटनेने चंद्रपूर शहर हादरून गेले.
घटनेची माहिती मिळताच आमदार जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट घेत, प्रकरणाची माहिती घेतली, मागील अनेक दिवसांपासून बल्लारपूर शहरात गुन्हेगारी अनियंत्रित झाली आहे.
बल्लारपूर शहरात भरदिवसा हत्येच्याया घटना वाढल्या असून आता तीच गुन्हेगारी प्रवृत्ती चंद्रपूर शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहे.
आमदार जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना या गुन्हेगारी प्रवृत्तीला संपविण्याचा सूचना देत, कायद्याच्या चौकटीत राहून ही वृत्ती सम्पविण्याचे निर्देश दिले.
मात्र ही गुन्हेगारीची घाण आपल्या शहरात यायला नको असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी म्हटले.