घुग्गुस - रेल्वेच्या जुन्या सायडिंगवर आज दुपारच्या सुमारास रेल्वे कर्मचारी फिरत असताना अचानक रेल्वेचा धक्का त्या कर्मचाऱ्याला लागला या घटनेत त्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही पाय निकामी झाले.
या घटनेत रेल्वे कर्मचारी 46 वर्षीय राजीव सदाशिव संगोजीवार हे आज दुपारच्या सुमारास रेल्वे सायडिंगवर फिरत होते, त्यावेळी लाईनवर मालगाडी उभ्या अवस्थेत होती, मात्र अचानक काही वेळात ती सुरू झाली, सदर कर्मचाऱ्याला रेल्वे सुरू झाली याचे भान नसल्याने त्यांना त्या रेल्वेचा धक्का लागला.
धक्का लागल्याने संगोजीवार हे खाली पडल्याने त्यांच्या पायावरून रेल्वे गेल्याने त्यांचा एक पाय हा अक्षरशः वेगळा झाला व दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ संगोजीवार याना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले.
