चंद्रपूर/गडचिरोली - क्रिकेट या खेळातून कोट्यवधी रुपये कमविण्यासाठी ऑनलाइन सट्टा उदयास आला असून IPL च्या हंगामावेळी ह्या बाजारात 1 हजार ते 2 हजार कोटी च्या घरात उलाढाल होत असते.
भारतात सट्टा प्रतिबंधित आहे मात्र छुप्या व ऑनलाइन पध्द्तीने हा व्यवसायाने जोर पकडला आहे.
हा व्यवसाय करणारे देशातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात असतात, अँड्रॉइड मोबाईल मध्ये क्रिकेट सट्ट्याची एप डाउनलोड करीत यावर COIN द्वारे पैसे लावले जातात.
असाच एक प्रकार गडचिरोली जिल्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
चंद्रपूर निवासी राकेश कोंडावार याला अहेरीत अटक करण्यात आली असून राकेश हा गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्याने आपले "पंटर" नेमले आहे.
सदर अटक ही एका मोठ्या प्रकरणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे, राकेश कडून लाखो रुपयांची रोख रक्कम सुद्धा जप्त करण्यात आली असून आतापर्यंत या प्रकरणात 10 ते 11 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या व्यापाराचे तार संपूर्ण विदर्भात पसरले असून सदर प्रकरणात मोठे मासे गळाला लागणार असल्याची माहिती आहे.
याबाबत गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस प्रशासन संपूर्ण प्रकरणाची अधिकृत माहिती देणार आहे.

