घुग्गुस - मागील अनेक दिवसांपासून शहरातील रामनगर वसाहतीमधील मार्गाची दुरावस्था झाली आहे, ह्या मार्गाचे तात्काळ डांबरीकरण व्हावे यासाठी स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे मात्र प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना या मार्गावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अनेकदा या मार्गावर अपघात सुद्धा झाले आहे.
ह्या नादुरुस्त मार्गाचे तात्काळ डांबरीकरण व्हावे यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे नेते इम्रान खान यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास ही बाब आणली, आमदार जोरगेवार यांनी तात्काळ वेकोलीचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे सूचना करीत मार्ग लवकर दुरुस्त व्हावा असे निर्देश दिले.
आमदार जोरगेवारांच्या सुचनेवर वेकोली ने त्या मार्गाचे डांबरीकरण लवकर करू असे आश्वासन दिले.
आमदार जोरगेवार यांना निवेदन देतेवेळी इम्रान खान, स्वप्नील वाढई व प्रीतम भोंगळे उपस्थित होते.

