चिमूर - चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथील जंगम वस्तीतील रहिवासी आरोपी बबलू मारोती सिंदेवार याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीला जंगलात सरपण आणण्याच्या बहाण्याने नेऊन ठार केले होते हि घटना मंगळवारला घडली होती दरम्यान आरोपीने हत्या केल्यावर घटना स्थळावरून फरार झाला होता पोलीसांनी बुधवार ला सायंकाळी त्याला जंगम बेड्यावरून अटक केली.
भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येनाऱ्या जांबुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रा मागील झुडपी जंगल परिसरात पत्नी शालू सिंदेवार व आरोपी पती बबलु सिंदेवार दोघेही सरपण आनन्यासाठी मंगळवार ला सकाळी गेले होते, बबलू हा तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता यातुनच जंगलात त्यांच्यात भांडण झाले.
पती बबलु चा राग अनावर झाला तेथेच त्याने तोंडावर दोन मोठे दगड मारले त्यामुळे ती बेशुद पडली, पत्नी शालु मरण पावली नाही म्हणून त्याने सरपण बांधासाठी आनलेल्या दोरीला तिच्या गळ्यात टाकून पिचकुन मारले त्यानंतर तो तेथुन फरार झाला, त्यानंतर तो जंगम बेड्यावर आला तिथे "मी माझ्या पत्नीला जीवनिशी मारले" असल्याची कबुली दिली. घटना स्थळावर पोलीस पोहचताच पोलीसांना तुरी देवून फरार झाला तो काही वेळ मालेवाडा सुगत कुटी येथे होता बुधवार ला आरोपी मालेवाडा येथे दारू प्यायलाचे समजते त्यानंतर तो जंगम बेड्यावर पोहचला तेथील लोकांनी पोलीसांना माहीती दिली बुधवार ला मोबाइल डॉग स्काट आला होता मात्र तो मिळाला नव्हता.
भिसी पोलीसांनी जंगम बेड्या वरून आरोपी बबलु याला अटक केली पोलीसासमोर शालुला जिवंत मारून प्रेत झुडपात ठेवल्याची कबुली दिली भिसी पोलीसांनी आरोपीवर भादवी ३०२ गुन्हा दाखल केला. भिसी पोलीसांनी आरोपीला चिमूर न्यायालयात गुरुवार ला दाखल केले असता न्यायालयाने शुक्रवार पर्यत पीसीआर दिला.
जांभुळघाट येथील जंगम वस्तीत राहणारे बबलू सिंदेवार व पत्नी शालू सिंदेवार हे दाम्पत्य भंगार व्यवसाय करून उपजीविका करीत होते त्याच्या संसार वेलीवर दोन अपत्य आहेत यापैकी एका मुलीचे लग्न झाले मुलगा पंधरा वर्षाचा आहे.