चंद्रपूर - राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्ह्यातील आरोपी 25 वर्षीय प्रदीप शेरकुरे यांची पोलीस कोठडी समाप्त झाल्याने आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव व नियमांचे पालन म्हणून कारागृहात नेण्याआधी आरोपीची कोरोना चाचणी करणे अनिवार्य असल्याने आरोपी शेरकुरे ला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.
RTPCR चाचणी करण्याआधी आरोपी प्रदीप ने मोठ्या शिताफीने हाथकडी सोडविली व बाजूच्या भिंतीवरून उडी मारत तिथून पळ काढला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
याबाबत चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
