चंद्रपूर - जिल्ह्याची दारूबंदी पूर्णतः हटविल्यानंतर प्रशासनाने दारूविक्री परवाना धारकांना नूतनीकरनासाठी आवाहन केले त्यानंतर परवाना धारकांनी आपले परवाने नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात कागदोपत्री पूर्तता केली.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर सोमवार 5 जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यातील 98 दारू दुकाने सुरू होणार आहे.
हे 98 दुकाने पहिल्या टप्प्यात सुरू होणार असून उर्वरित दुकाने दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहे.
मद्यप्रेमींना आता सोमवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
