पाथरी - फिर्यादी हे चंद्रपूर येथील रहीवासी असून तक्रारदार यांचे मौजा निफंद्रा .स्टे . पाथरी जि . चंद्रपूर येथे नातेवाईकाकडे अधून - मधून जात असुन निफंद्रा येथे गेला असतांना तो सट्टा - पट्टी ( जुगार ) लावण्याचा धंदा करीत होता . गै अ . पोटावी यांनी अंदाजे सहा महिण्यापुर्वी तकारदारास सट्टा - पट्टी ( जुगार ) लावण्याचा धंदा करित असतांना पकडले असता त्यांचेविरुध्द कार्यवाही न करण्याकरीता तक्रारदार यांचेकडे २०,००० / -रू लाचेची मागणी करून सोडुन दिले . त्यानंतर गेल्या सहा महिण्यापासुन गै.अ. हे तक्रारदार यास सदर २०,००० / - रू . देण्याबाबत फोनद्वारे सतत तगादा लावला . परंतु तकारदार यांची पोटावी यांना लाच म्हणून २०,००० / -रु . देण्याची त्यांची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द लाप्रवि कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून दिनांक १३/०७/२०२१ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये गैरअर्जदार यांनी तकारदार यांचेकडे २०,००० / - रू . ची मागणी करून तडजोडीअंती सध्या १५,००० / -रु . लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाल्याने आज दि . १४/०७/२०२१ रोजी पाथरी येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी उमेश गोपाला पोटावी ना पो शि . / २४५१ , पो.स्टे . पाथरी , जि . चंद्रपूर यांना १५,००० / -रु . लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे. सदरची कार्यवाही ही श्रीमती रश्मी नांदेडकर , पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक , ला.प्र.वि. नागपुर , मिलींद तोतरे , अपर पोलीस अधिक्षक , ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक श्री.अविनाश भामरे , ला.प्र.वि. चंद्रपूर तसेच कार्यालयीन स्टॉफ पोहवा मनोहर एकोणकर , नापोकॉ . अजय बागेसर , पो.कॉ , रोशन चांदेकर , नरेशकुमार नन्नावरे , संदेश वाघमारे , चापोका सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे . यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात येत आहे.
