प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नुकत्याच झालेल्या मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली आणि होत्याच नव्हतं झालं. मुल तालुक्यातील बेंबाळं पोलीस दूर क्षेत्राच्या हद्दीत जूनगाव ते घोसरी मार्गावर शेतकरी शेतीचे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली घडली असून या दुर्घटनेत एक महिला व एक पुरुष आणि दोन बकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, त्यांच्यासोबत काम करीत असलेली एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतकामध्ये विलास केशव नागपुरे वय (50) व सौ. गयाबाई पोरटे वय (60) अशी शेतकऱ्यांची नावे असून जखमी मध्ये मृत पावलेल्या महिलेचे पती व पुरुषाची पत्नी यांचा समावेश आहे. मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार आज दुपारी 3 च्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली .पावसापासून बचाव करण्यासाठी चारही शेतकरी जूनगाव ते घोसरी मार्गावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला तेवढ्यात त्यांच्यावर काळाने झडप घेतली आणि वीज कोसळली, या दुर्घटनेत दोघे ठार तर दोघे गँभिर आणि शेळ्या ठार झाल्याने बेंबाळनांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
