चंद्रपूर मनपा - शनिवार 24 जुलै ला चंद्रपूर मनपा हद्दीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार असून शहरातील 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोज तर 4 केंद्रावर कोवॅक्सिन च्या पहिल्या व दुसऱ्या डोज चे लसीकरण सुरू राहणार आहे.
लसीकरणाची वेळ ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे, नागरिकांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधित लसीकरण करून स्वतः व परिवाराला कोरोना पासून सुरक्षित करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
