चंद्रपुर : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी यांनी शिवसंपर्क मोहिमेची घोषणा केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात १२ जुलै ते २४ जुलैदरम्यान शिवसंपर्क मोहीम राबविणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांनी सांगितले. या मोहिमेदरम्यान जो पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला आहे, तो या मोहिमेत यशस्वी करा. तसेच शिवसैनिकांनो आपले गाव व वॉर्ड कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
बल्लारपुर,चंद्रपुर व राजूरा विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती क्षेत्रा गण प्रमाणे गावात व नगर पंचायत,नगरपरिषद,महानगर पालिका येथे प्रत्येक प्रभागात बैठका घेण्यात येईल. व या शिव जनसंपर्क अभियानात जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम,यांनी प्रत्येक बैठकाला उपस्थीत राहणार आहे. लसीकरण करणे, नागरिकांच्या काय अडीअडचणी समजून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी या बैठकीला शिवसेना पदाधिकारी संदिपभाऊ करपे,उपजिल्हा प्रमुख सिक्की भैया यादव,सौ.सरिताताई कुडे,शहर प्रमुख प्रमोद पाटिल,युवासेनेचे निलेश बेलखेडे,तालुका प्रमुख संतोष नरुले,आशिष कावटवार,बबन ऊरकुडे,राजू डोहे,सौ,वर्षा कोठेकर,माया पटले,शालीक फ़ाले, सरपंच अनिल सोनूले,रमेश पेटकर व आदी आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.