चंद्रपूर - आम्बेडकर इंटरनेशनल सेंटर तसेच बोधिपथ मल्टीपरपज सोशल ऑर्गनाइज़ेशन तर्फे दिनांक 17 जून गुरुवारी दुपारी 3.30 वाजता बुद्धिस्ट समन्वयक समिति सभागृह इंदिरा नगर बंगाली कैम्प येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोरोना चे येणारे संकट लक्षात घेऊन आपल्या समाजातील व इतरही गरजू लोकना मदत मिळावी या उदात्त हेतुने व कोरोंना काळात गरीब व गरजु लोकांना त्वरित ऑक्सीजन मिळावे या साठी ऑक्सीजन (कोसंट्रेटर)ची मशीन बुद्धिस्ट समन्वयक समिति इंदिरा नगर कृष्णा नगर यांना भेटस्वरूपात देण्यात आली.
कोरोना काळात लोकांची ऑक्सिजन साठी झालेली वणवण लक्षात घेता संस्था अध्यक्षा शलाका निखिलेश खोब्रागडे व अश्विनी खोब्रागडे सल्लागर सदस्य यांनी बोधिपथ या आपल्या संस्थे मार्फत व आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर अमेरिका यांच्या तर्फे ऑक्सिजन कॉनसनट्रेटर मशीन समाजातील गरजू लोकांना प्राथमिक उपचार मिळावी या साठी बुद्धिस्ट समन्वयक समिती ला लोकार्पण करण्यात आली ,या प्रसंगी डॉ मंगेश गुलवाडे, डॉ आनंद बेंडले, डॉ बंडू रामटेके व हरीश सहारे ,निखिलेश खोब्रागडे,अनुताई दहेगवकर,शालिनी भगत,ऍड मलक शकिर ,पंकज गावंडे,उपस्थित होते,डॉ बेंडले यांनी तात्काळ कसे मशीन वापरायचे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले,बुद्धिस्ट कृती समितीच्या सर्व लोकांनी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर व बोधिपथ सोशल ऑर्गनाईझाशन चे आभार मांडले.
