प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - 2020 ते 2021 साठी मक्का उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने खरेदी केंद्रावर शासनाने ठरवून दिलेली मक्याची प्रति शेतकरी मर्यादा अत्यंत कमी असून मक्का उत्पादक शेतकऱ्याला एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन झालेला आहे. मूल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मक्का खरेदी केंद्रावर नोंदणीकृत 28 शेतकऱ्यांसाठी सर्व मिळून निवड 200 किंटल ची मर्यादा ठरवून दिलेली आहे ती अत्यंत तोकडी असून त्यापेक्षा किती तरी पटीने मक्का उत्पादन झालेला आहे. त्यामुळे महोदय आपणास विनंती आहे की संबंधित शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेला सर्व माल मक्का खरेदी केंद्रावर घेण्यात यावा व शेतकऱ्यांचा होणाऱ्या आर्थिक नुकसाना पासून त्यांना संरक्षण द्यावे ही विनंती.ही मागणी पुर्ण झाली नाही तर युवा वर्ग शेतकरी बांधवांना धरून आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार व आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास याला आपण स्वत: व संबंधित प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा निवेदन मार्फत देण्यात आला.
निवेदन देतानां निखिल वाढई,प्रणित पाल,आकाश येसनकर,निहाल गेडाम,विकास भुरसे,जितेंद्र सातपुते,सुरज गेडाम,प्रमोद मनक्कीवर,विलास सातपुते आदी उपस्थित होते.
