चंद्रपूर - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सन्मानीय श्री. उदय सामंत साहेब चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता चंद्रपूर जिल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संदीप भाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख इंजि.निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी व तंत्रनिकेत महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या काहि अभियांत्रिकी संस्थेतील मागील १०-१२ महिन्यापासूनच्या थकीत वेतनासंबंधी चर्चा करण्यात आली. थकीत वेतनासंबंधी चर्चेत असे लक्षात आले कि शैक्षणिक सत्र २०२०-२१ ची शिष्यवृत्ती अद्यापही शासनाकडून प्राप्त न झाल्याने सर्व विनाअनुदानित अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवण्यात आलेले आहे. करीता शैक्षणिक सत्र २०२०-२१ ची शिष्यवृत्तीची रक्कम लवकरात लवकर संबंधित सर्व महाविद्यालयांना देण्यात येण्याचे विनंती करण्यात आली.
सर्व विनाअनुदानित महाविद्यालयाला प्राप्त होणारे शिष्यवृत्ती चे अनुदान हे सर्वोतोपरी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करण्यासंबंधीचे निर्देश सर्व विनाअनुदानित अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संस्था प्रमुखांना देण्यासंबंधीचे निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून थकीत पगारावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या दयनीय अवस्थे बद्दल सांगण्यात आले. कोरोना रोगाच्या संसर्गामुळे पसरलेल्या महामारीच्या काळातही अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षकांनी आपली जबाबदारी अत्यंत चोख पने पार पाडलेली आहेत. साहेबानी उपरोक्त विषयाला गंभीरतेने घेतले आणि लगेच तंत्रशिक्षण संचालक श्री. अभय वाघ यांच्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून सदर विषयासंबंधी विचारणा केली आणि लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सदर सत्राची शिष्यवृत्ती महाविद्यालयांना प्राप्त होताच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण पगार करण्यात यावे आणि असे न झाल्यास संबंधित महाविद्यालयावर चौकशी करण्याचे हि त्यांनी सांगितले. निवेदन देताना समन्वयक विक्रांत सहारे, प्रा.राहुल भोयर,अमोल चवरे, अक्षय अंबिरवार, करन वैरागडे,प्रा.राहुल भोयर, नंदू अराडे, उपस्थित होते.