प्रतिनिधी/अनिकेत अगडे
तळोधी बाःमृग नक्षत्रात पावसाला दमदार सुरवात झालेली असताना शेतात जंगलात दबा धरुन असलेले साप बाहेर निघू लागल्यामुळे अनेकांच्या घरात ,बाथरुममध्ये विषारी ,बिनविषारी साप आढळून येत असल्याने जनता भयभीत होत आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत तळोधी बा.येथील सर्पमित्र जीवेश सयाम यांनी देलनवाडी, जनकापूर, पळसगांव, ओवाळा, वलनी, मांगरुड, वलनी,तळोधी,लखमापूर ,बाळापूर,सावरला,नांदेड येथून गव्हारे नाग,धामण,धोणस,धुळ नागीण अशा वेगवेगळ्या प्रजातीचे साप पकडून त्याला जीवदान दिले असताना काल वलनी येथे रोहित पाटिल व तेजराम उईके यांच्या प्लाँट मध्ये ग्व्हारा नाग साप पकडले .तळोधी बा.येथील वनविभाग कार्यालयात सापाची नोंद करुन गायमुख जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. सर्प मित्राकडून जोखमी स्विकारुन साप पकडण्यासाठी रात्री बेरात्री जी धडपड केली जात असताना मात्र वनविभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची मदत केली जात नसल्यामुळे सर्पमित्राला वनविभागाकडून मानधन तत्वावर मानधन उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे .