प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेफडो टीम चंद्रपूर च्या वतीने मुल येथे ताडाळा रोड परिसरात सौ. प्रभा चौथाले मॅडम चंद्रपुर जिल्हा संघटिका यांचे घरी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.सर्वप्रथम पर्यावरण रक्षण शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला.नागपुर विभाग उपाध्यक्षा सौ तेजस्विनी नागोसे यांनी एक कुटुंब एक झाड किंवा एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना राबवून वृक्षारोपण करा असे आवाहन केले.चंद्रपुर जिल्हा अध्यक्षा सौ ललिता मुस्कावार व सुखदेव चौथाले सर यांनी काळाजी गरज ओळखून पर्यावरण पुरक मार्गदर्शन केले. जिल्हा संघटिका कविता मोहुर्ले आणि मुल तालुका सचिव सौ मंगला गोंगले यांनी वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड किती गरजेचे आहे हे पर्यावरणपुरक गीतातुन समजावून सांगितले.
यावेळी शेवगा आणि टेंभुर या बियांचे रोपण करण्यात आले शेवटी आंबा आणि कांचन या रोपांचे रोपण करण्यात आले. तसेच संस्थेच्या प्रत्येक संघटिकांनी आपआपल्या स्वतःच्या घरी किंवा शेतावर व बांधावर वृक्ष लावावे असे आव्हान केले.
प्रसंगी नागपूर विभाग उपाध्यक्षा सौ तेजस्विनी नागोसे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा सौ ललिता मुस्कावार, जिल्हा सचिव सौ रत्ना चौधरी, जिल्हा संघटिका कविता मोहुर्ले, जिल्हा संघटिका सौ प्रभा चौथाले, जिल्हा संघटक श्रीरंग नागोसे सर,मुल तालुका सचिव सौ मंगला गोंगले, तालुका संघटिका सौ वंदना गुरनुले, तालुका संघटिका सौ इंदु वाढई, तालुका संघटिका सौ सुषमा कुंटावार, श्री.चौथाले आणि अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
सुषमा कुंटावार यांनी केला बियाणे गोळा करण्याचा उपक्रम
तालुका संघटिका सुषमा कुंटावार यांनी आपल्या मुलीच्या २२ व्या वाढदिवसा निमित्य विविध वृक्ष लागवडीच्या बियाने गोळा करुन त्या पिशव्यामध्ये भरण्याचा अनोखा उपक्रम केला असून ३० बॅगमध्ये आंबा,चिंच, बदाम, अशी रोपे तयार करण्यासाठी स्वतः हा पुढाकार घेऊन पिशव्या भरण्याचे काम पूर्ण करुन एक नवा संदेश पर्यावरण जोपासणाऱ्या आणि वृक्ष लागवड करणाऱ्या वृक्ष प्रेमी बंधू,-भगिनींना दिला आहे. एवढेच नव्हे तर एक मूल-एक झाड, या म्हणी प्रमाणे छोट्या मुलांकडून वृक्ष लागवड करऊन घेतली. अशा विविध उपक्रमाद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
