चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मधील बफर क्षेत्रातील डोनी गावाजवळ एक वाघ बेशुद्धावस्थेत पडला होता, गावातील नागरिकांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता वनविभागाची चमू व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे हे डोनी गावात पोहचले.
त्या वाघावर वनविभाग मागील 2 ते 3 दिवसापासून पाळत ठेवून होते.
सदर चमू वाघाजवळ पोहचले असता अचानक वाघाने हल्ला चढविला, अचानक झालेल्या हल्ल्यात सर्व सैरावैरा पळू लागले, पळताना डॉ. खोब्रागडे हे अचानक खाली पडले, वाघाने डॉ. खोब्रागडे यांच्यावर हल्ला चढविला, वाघाने त्यांचे दोन्ही पाय जबड्यात पकडले असता त्यांच्या एका पायाचे बोट तुटून पडले व दुसऱ्या पायाला गंभीर इजा झाली.
सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यावर तो वाघ पळून गेला, जखमी डॉ. खोब्रागडे यांना शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.