घुग्गुस - शुक्रवार 4 जून रोजी शांतीनगर वसाहती मध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर सकाळी 6 वाजता आरोपी मोहम्मद यासीन नूर या युवकाने बलात्कार केल्याची घटना घुग्घूस येथे घडली.
व भविष्यामध्ये असे कृत्य गावामध्ये घडायला नको त्याकरिता दि. ७ जून रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घूस शिवसेना शहर प्रमुख (प्र) सतीश भाऊ बोंडे यांनी निवेदन द्वारे आरोपी वर कठोर कारवाही करावी अशी मागणी घुग्घूस पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली . यावेळी निवेदन देताना युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, महिला आघाडी घुग्घूस प्रभारी शहर अध्यक्षा संध्याताई जगताप, जयश्री ताई, युवासैनिक चेतन बोबडे, सतीश गोहोकार आदि उपस्थित होते.
