चंद्रपूर - कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता दोन महिन्यांपूर्वी संचारबंदी लागू करण्यात आली, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ओघ कमी झाल्याने जिल्ह्यातील बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या.
या संचारबंदीचे अनेकांवर उपासमारीची पाळी आली होती, मात्र आता 2 महिन्यांनी जीवन पूर्वपदावर येत आहे.
बाजारपेठ सुरू झाल्याने नागरिकांची गर्दी वाढली असली तरी व्यापारी मात्र शिस्तीत आले आहे, दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मास्कचा नियमित व सॅनिटायझर चा उपयोग बंधनकारक केला आहे.
नागरिक आजही मास्क घातल्यावर काही वेळात काढून टाकत आहे.
यंदा नागरिक बेशिस्त तर व्यापारी कोरोना नियमांची शिस्त पाळत आहे.
