News34
#Korpnanews
प्रतिनिधी/सैय्यद मुमताज अली
कोरपना :- तालुक्यातील दालमिया भारत सिमेंट कंपनीत संतोष रामाचल चव्हाण नामक कामगार शिवा कन्स्ट्रक्शन कडे सुपरवायजरचे काम करतांना उंचावरून पडल्याने त्याला उपचारासाठी नेत असतांना गडचांदूर जवळ मृत्यू झाल्याने ग्रामीण गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करणार असल्याची माहिती असून याठिकाणी दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी पोहोचले आहेत.
सोबतच दालमिया कंपनीचे व्यवस्थापन कमीटी रुग्णालयात हजर असल्याची माहिती आहे दालमिया कंपनीत स्थायी नोकरी व मृतकाच्या परिवाराला आर्थिक साहाय्य करण्यात यावे अशी मागणी मृतकाच्या कुटुंब व कामगारातून होत आहे बातमी लिहिपर्यंत शवविच्छेदन व्हायचे होते.
