News34
#Babupethnews
चंद्रपूर - रेल्वेचा विद्युत शॉक लागल्याने 14 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास शहरातील बाबुपेठ रेल्वे स्टेशनवर घडली आहे.आचल गणेश आत्राम असे मृत युवतीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार मृतक आचल आत्राम हि युवती रेल्वे वॅगन मधून कोळसा काढण्यासाठी रेल्वे वॅगनवर चढली आणि त्यातच तीला रेल्वेचा विद्युत शॉक लागल्याने तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या घटनेची माहिती रेल्वे पोलीस तसेच शहर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.व मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
