ब्रह्मपुरी :- जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वीज पडून कालच सेवानिवृत्त झालेले शिक्षक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
31 मे ला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय जयस्वाल हे कालच सेवानिवृत्त झाले मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
सेवानिवृत्त झाल्यावर शिक्षक जयस्वाल हे कामाचा ताण कमी झाल्याने आपल्या मेंडकी येथील शेतातील बांधावर बसून होते, मात्र त्यावेळी नियतीने आपला क्रूर खेळ खेळला.
अचानक वातावरणात बदल झाला, पावसाचे आगमन व वादळी वातावरण सुरू झाले मात्र त्याच क्षणी विजेचा कडकडाट झाल्याने ती वीज सेवानिवृत्त शिक्षक यांच्या अंगावर कोसळली.
त्यात संजय जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करीत त्यांचा मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला.