घुग्गुस - सुभाषनगर येथील वेकोली वसाहतीमधील क्वार्टर हे अत्यन्त जीर्ण अवस्थेत झाले आहे, वसाहती मध्ये राहणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांनी या संबंधात अनेकदा वेकोली कडे निवेदने दिली मात्र त्यावर नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी एका क्वार्टर मधील स्लॅबचा काही भाग कोसळला होतो सुदैवाने त्यामध्ये कसलीही हानी झाली नव्हती.
मात्र आता पुन्हा 3 जूनला सुभाषनगर मध्ये पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती घडली.
सायंकाळी 5 वाजता अचानक क्वार्टर मधील स्लॅबचा भाग कोसळला, तो भाग चारचाकी वाहनांसाठी लावण्यात आलेल्या शेडवर पडल्याने कार व दुचाकीला नुकसान झाले.
त्या क्वार्टर मध्ये एकूण 4 कुटुंब वास्तव्यास आहे, संचारबंदी असल्याने त्यांच्या घरातील लहान मुले सावली असल्याने शेडच्या खाली खेळत असतात.
सदर क्वार्टर अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे, नवीन वसाहत उभारण्याचे सोडून त्याच वसाहतीला नेहमी दुरुस्त करण्यात येते मात्र ती सुद्धा अपूर्ण.
वेकोली स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेप्रति गंभीर नाही हे यावरून दिसून येते.
सदर क्वार्टरचा सोक्षमोक्ष वेकोली ने करावा अशी मागणी वेकोली कर्मचाऱ्यांनी केली आहे.